about.content
(संस्थापक | संसद सदस्य (खासदार), भारत सरकार | गडप्रेमी)
महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. या भूमीवर सुमारे ३५० किल्ले आहेत, जे महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष देतात. हे किल्ले केवळ ऐतिहासिक वारसा नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या वीर इतिहासाचे आणि सांस्कृतिक गौरवाचे प्रतीक आहेत. गड-किल्ले आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि नेतृत्वाची आठवण करून देतात."एक दिवस महाराजांसाठी, महाराजांच्या स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या गड-किल्ल्यांसाठी!"छत्रपती शिवाजी महाराजांचे सह्याद्रीच्या कुशीतील गड, किल्ले तसेच दुर्ग यांच्या संवर्धन आणि स्वच्छतेची मोहीम महिन्यातून एका रविवारी करण्याचा संकल्प केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या हृदयात जिवंत ठेवण्यासाठी, त्यांच्या गड-किल्ल्यांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे.