आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम
आपला मावळा, लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली शिवकालीन गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि इतिहास जतनासाठी एक सशक्त मोहीम आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश ऐतिहासिक वारशाचे संरक्षण, पर्यावरणाची जपणूक आणि जनजागृती साधणे हा आहे.
🗓 मोहीमेचा दिवस: रविवार, 26 ऑक्टोबर 2025
🕖 वेळ: सकाळी 07.00 वाजता
📍 स्थळ: किल्ले भुदरगड, ता. भुदरगड, जि. कोल्हापुर
🏕 मुक्काम दिनांक: शनिवार, 25 ऑक्टोबर 2025
🏠 मुक्कामाचे ठिकाण: (नंतर कळविले जाईल.)
📌 मुक्कामाच्या ठिकाणाचे लोकेशन: (नंतर कळविले जाईल.)
🗓️ नोंदणी अंतिम तारीख – 23 ऑक्टोबर 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत.
🌐 किल्ले भुदरगड मोहीम नोंदणी लिंक – Link
नोंदणी संबंधी अडचण असल्यास संपर्क करा – 9422458462, 9637943333
नोंदणी प्रक्रिया –
1) ज्यांनी यापुर्वी बेवसाईटवर नोंदणी केलेली आहे त्यांनी वरील लिंक वर क्लिक करावे, त्यानंतर आता “आता नाव नोंदवा” वर क्लिक करून आपला मोबाईल नंबर व ओटीपी टाकावा. ओटीपी टाकून लॉगीन केल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांचे अचूक पर्याय निवडून “सबमिट” बटनवर क्लिक करावे. त्यानंतर आपली नोंदणी यशस्वी होईल. “अधिक जाणून घ्या” वर क्लिक केल्यानंतर आपणास मोहिम विषयी अधिक माहीत मिळेल.
(नोंदणी लिंकवर जाऊन तेथे “नोंदणीकृत” असे दिसत असेल तर आपली नोंदणी यशस्वी झाली आहे. नोंदणी यशस्वी झाल्याचा आपणास व्हाट्सअप वर मॅसेज येईल.)
2) जर यापुर्वी वेबसाईटवर नोंदणी/ रजिस्ट्रेशन केले नसेल तर – वरील लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर “आता नाव नोंदवा” वर क्लिक करा. नंतर “नोंदणी करा” यावर क्लिक करावे, त्यानंतर नोंदणी फॉर्म दिसेल तो व्यवस्थित व अचूक भरून “ओटीपी पाठवा” वर क्लिक करावे. त्यानंतर आपले प्रोफाईल तयार होईल. पुन्हा वरील लिंकवर जाऊन “आता नाव नोंदवा” वर क्लिक करावे, विचारलेल्या प्रश्नांचे अचूक पर्याय निवडून “सबमिट” बटनवर क्लिक करावे. त्यानंतर आपली नोंदणी यशस्वी होईल.
📌 स्वयंसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना
संकल्पना – लोकनेते खासदार डॉ. निलेश जी लंके साहेब
आयोजक – आपला मावळा संघटना
चला तर मग! हजारो मावळ्यांच्या जयघोषात आपण सारे भेटूया किल्ले भुदरगड च्या पायथ्याशी.
इतिहासाशी नातं जोडूया, संस्कृतीचं रक्षण करूया!
आम्ही येतो… तुम्ही या!!
#आपला_मावळा #गडकिल्ले_मोहीम #भुदरगड #लोकनेते_निलेशजीलंके #जयशिवराय