@notAuth('volunteer') @endnotAuth
Facebook Instagram X youtube

पुढील मोहिम

शिवकालीन गडांचा जागर… जनतेच्या सहभागातून!

किल्ले भुदरगड
किल्ले भुदरगड
भुदरगड किल्ला – इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचा संगम भुदरगड किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात वसलेला एक प्राचीन किल्ला आहे. इ.स. 1190 मध्ये शिलाहार राजा विक्रमादित्य भोज यांनी याची निर्मिती केली. इ.स. 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची दुरुस्ती करून येथे लष्करी ठाणे स्थापले आणि दक्षिणेकडील संरक्षणासाठी त्याचा प्रभावी वापर केला. गडावरील प्रमुख स्थळांमध्ये गोव्यातील मंदिरशैलीत जांभ्या दगडात बांधलेले भैरवनाथ मंदिर, शिवमंदिर, दुधसागर तलाव, दीपमाळा, तटबंदी, गुहा मंदिर, समाध्या आणि ऐतिहासिक तोफा यांचा समावेश होतो. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा त्रिवेणी संगम असलेला भुदरगड किल्ला महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेची साक्ष देतो आणि प्रत्येक भेटणाऱ्याला सांस्कृतिक अभिमानाची अनुभूती देतो.
iconदिनांक: २६ ऑक्टोबर २०२५
icon ठिकाण: किल्ले भुदरगड, ता. भुदरगड, जि. कोल्हापुर
icon अंतिम तारीख व वेळ: २०२५-१०-२५ २३:५९:५९

मागील मोहिमा

किल्ल्यांचा सन्मान, स्वच्छतेसाठी अभियान

शिवनेरी
शिवनेरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता व संवर्धन मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अधिक जाणून घ्या
icon दिनांक: १६ मार्च २०२५
धर्मवीरगड
धर्मवीरगड

चैत्र पौर्णिमा १२ एप्रिल २०२५ हा हिंदू पंचांगातील एक महत्त्वाचा दिवस आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे यामुळे या महिन्यामध्ये धर्मवीरगड स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.

अधिक जाणून घ्या
icon दिनांक: १३ एप्रिल २०२५
रायरेश्वर
रायरेश्वर

"जिथे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, तिथे आता आपण घेतोय स्वच्छतेचा, संवर्धनाचा आणि जतनाचा संकल्प!"

अधिक जाणून घ्या
icon दिनांक: २५ मे २०२५