आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
सर्व स्वयंसेवकांना कळविण्यात येते की, आग्रा फोर्ट मोहिमेसाठी नोंदणीची संख्या 500 पेक्षा जास्त झाल्याने योग्य नियोजन, रेल्वे तिकीट, निवास व भोजन व्यवस्थेच्या दृष्टीने नोंदणी प्रक्रिया वेळेपूर्वीच बंद करण्यात आलेली आहे. ज्यांना मोहीमेत सहभागी होण्याची इच्छा होती परंतु नोंदणी करता आली नाही, त्यांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
ज्यांनी नोंदणी केलेली आहे, येणे निश्चित आहे पण अद्याप आधार कार्ड पाठविलेले नाही, त्यांनी कृपया 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत आपले आधार कार्ड 9422458462 या क्रमांकावर पाठवावे, ही विनंती. आग्रा मोहीमेसाठी नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांसाठी पुढील सूचना व तपशील लवकरच आपणास कळविण्यात येतील.
सर्व स्वयंसेवकांना कळविण्यात येते की, आग्रा फोर्ट येथे आयोजित करण्यात येणाऱ्या शिवकालीन गडकोट संवर्धन मोहिमेसंबंधी नोंदणी सुरू असून नोंदणी करणाऱ्यांना खालील सूचना व नियमावली लागू राहील:
1. तारीख बदलण्याची शक्यता – आग्रा मोहीमेची 13 डिसेंबर 2026 ही तारीख संभाव्य आहे. नियोजन, परवानगी किंवा अन्य कारणास्तव तारखेत बदल होऊ शकतो.
2. मोहीमेचा कालावधी – संपूर्ण मोहिमेस अंदाजे 5–6 दिवस लागतील. संभाव्य तारखेच्या दोन दिवस अगोदर प्रस्थान होईल.
3. अतिरिक्त कार्यक्रम – शक्य झाल्यास आग्रा फोर्ट मोहिमेनंतर दिल्ली येथे संसद भवन भेट व इतर ऐतिहासिक स्थळांची भेट आयोजित केली जाईल.
4. नोंदणी मर्यादा – नोंदणी लिंक फक्त 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. त्यानंतर कोणतीही नोंदणी किंवा तिकीट प्रक्रिया केली जाणार नाही.
5. रेल्वे तिकीट प्रक्रिया – 10 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांनी आधार कार्ड पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर रेल्वे तिकीट व पुढील नियोजन केले जाईल.
6. आधार कार्ड सादर करणे – ज्यांनी नोंदणी केलेली आहे व ज्यांचे येणे निश्चित आहे त्यांनीच रेल्वे तिकीटासाठी आपले आधारकार्ड द्यावे.
7. १८ वर्षाखालील स्वयंसेवक – १८ वर्षाखालील मुला–मुलींना एकट्यांना मोहीमेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अशा स्वयंसेवकांना पालक किंवा जबाबदार संरक्षकासोबत यावे लागेल.
8. नोंदणी झाल्यानंतरच नियोजन – रेल्वे तिकीट, निवास व इतर नियोजन फक्त नोंदणी झालेल्या स्वयंसेवकांसाठीच केले जाईल.
9. माहितीची अचूकता – नोंदणी करताना व रेल्वे तिकिटासाठी दिलेली माहिती अचूक असणे आवश्यक आहे; चुकीची माहिती दिल्यास नोंदणी रद्द होऊ शकते.
10. अधिकृत माहिती प्रकाशन – आग्रा मोहीम व दिल्ली भेट संबंधी पुढील तपशील व सूचना 01 नोव्हेंबरनंतर वेबसाईटवर प्रकाशित केल्या जातील.
11. प्रवेश नियमावली – रेल्वे तिकीट, निवास व इतर नियोजन यामुळे फक्त नोंदणी झालेल्या व रेल्वे तिकीट असलेल्यांनाच मोहीमेत प्रवेश मिळेल.
12. नोंदणी नसलेल्यांना प्रवेश नाही – नोंदणी न केलेल्या व्यक्तींना मोहीमेत कोणत्याही प्रकारे प्रवेश दिला जाणार नाही.
13. स्वतंत्र सूचना – आग्रा मोहिमेसाठी नोंदणी झालेल्या व रेल्वे तिकीट निश्चित झालेल्या स्वयंसेवकांना पुढील सूचना व माहिती स्वतंत्रपणे कळविली जाईल.
14. आयोजकांचा हक्क – नियोजन, परवानगी, रेल्वे तिकीट किंवा अन्य कारणास्तव आग्रा फोर्ट मोहीमेच्या तारखेत बदल करण्याचा किंवा मोहीम रद्द करण्याचा हक्क आयोजकांकडे राखीव आहे.
🚩 चला तर मग! इतिहासाशी नातं जोडूया, संस्कृतीचं रक्षण करूया, आणि आग्रा फोर्टवर एकत्र येऊन संवर्धनाचा संकल्प करूया!