@notAuth('volunteer') @endnotAuth
Facebook Instagram X youtube
campaign-detail-bg
प्रतापगड
प्रतापगड
icon दिनांक२४ ऑगस्ट २०२५
icon ठिकाण: प्रतापगड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा

वर्णन

🏰 प्रतापगड किल्ला : इतिहास, निसर्ग आणि साहसाचा जिवंत संगम

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या घनदाट जंगलात, जावळी खोऱ्याच्या कुशीत उभा असलेला प्रतापगड किल्ला म्हणजे मराठ्यांच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि सांस्कृतिक वारशाचा साक्षीदार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने बांधलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे, इतिहास सांगत आहे आणि निसर्गाच्या सौंदर्याने मन मोहून टाकतो.

📜 ऐतिहासिक महत्त्व

इ.स. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी प्रतापगडाचे बांधकाम सुरू केले. याचे मुख्य उद्दिष्ट पार घाटाचे संरक्षण करणे आणि नीरा व कोयना नद्यांवर नियंत्रण ठेवणे होते. परंतु, या किल्ल्याचे खरे महत्त्व १० नोव्हेंबर १६५९ रोजी घडलेल्या अफझलखानवधाच्या ऐतिहासिक घटनेमुळे अधोरेखित झाले.

अफझलखानाने शिवाजी महाराजांची हत्या करण्याचा कपटी प्रयत्न केला, परंतु महाराजांनी चतुराईने त्याचा वध केला. त्यानंतर सय्यद बंडा या अंगरक्षकाने शिवरायांवर हल्ला केला, पण जीवा बंडा याने त्याला रोखून महाराजांचे रक्षण केले. या घटनेमुळे प्रतापगड मराठा साम्राज्याच्या सामरिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला.

🛡️ स्थापत्य आणि रचना

प्रतापगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून समुद्रसपाटीपासून सुमारे १०८१ मीटर (३५४३ फूट) उंचीवर आहे. किल्ला दोन भागांत विभागलेला आहे—मुख्यकिल्ला आणि बालेकिल्ला. दोन्ही भागांमध्ये तलाव, बुरुज, गुप्त मार्ग आणि मजबूत तटबंदी आहे.

महादरवाज्यापासून सुरू होणारी पायवाट चिलखती बुरुज, भवानी मंदिर, हनुमान मूर्ती, केदारेश्वर मंदिर, जिजाबाईंचा वाडा, शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि अफझलखानाची समाधी अशी एक ऐतिहासिक फेरी घडवते.

🙏 धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

किल्ल्यावर तुळजा भवानीचे मंदिर आहे, जे शिवरायांनी स्वतः स्थापले. मंदिरात नेपाळमधून आणलेल्या शाळिग्राम शिळेपासून घडवलेली भवानीमातेची मूर्ती आहे. तिच्या शेजारी शिवरायांचे स्फटिक शिवलिंग आणि हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.

शिवरायांनी युद्धाला जाण्यापूर्वी शिवलिंगाची स्थापना केली होती. भवानी मंदिराच्या शांत परिसरात भक्तांना मानसिक समाधान मिळते.

🌄 निसर्ग सौंदर्य आणि पर्यटन

प्रतापगड किल्ल्याच्या शिखरावरून दिसणारे कोंकणातील शेकडो किलोमीटरचे दृश्य, हिरव्यागार दऱ्या आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा मनाला भुरळ घालतात. पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवाईने नटतो, तर धुक्याच्या वेळी किल्ला स्वप्नवत भासतो.

"आपला मावळा" कडून स्वच्छता व संवर्धन - 


🗓️ २४ जुलै २०२५ रोजी प्रतापगड किल्ल्यावर पार पडलेली स्वच्छता व संवर्धन मोहीम ही केवळ एक उपक्रम नव्हता — ती एक शिवस्मरणाची चळवळ होती. इतिहास, पर्यावरण आणि लोकसहभाग यांचा अभूतपूर्व संगम या दिवशी घडला.


🎯 उद्दिष्ट
गड स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन, शिवकालीन वारसा जतन, पर्यावरण संवर्धन, आणि सर्वधर्मीय एकात्मतेचा संदेश देणे हे या मोहिमेचे मुख्य ध्येय होते.

🌿 मोहिमेची वैशिष्ट्ये
- हजारो शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग — मुसळधार पावसातही न थांबणारा उत्साह
- अफजल खान वधाचा थरारक सादरीकरण — इतिहास जिवंत करणारा क्षण
- गड स्वच्छता, वृक्षारोपण, आणि वृक्ष संवर्धनासाठी ट्री-गार्डची स्थापना
- डस्टबिन्स, वीज व्यवस्था, माहिती व सूचना फलक यांची उभारणी
- मंदिर परिसरात स्वच्छता व श्रद्धेचा सन्मान
- गडाच्या भिंतीवरील व मंदिर परिसरातील उगवलेले गवत काढून सौंदर्य वृद्धिंगत
- विश्रांतीसाठी बाकड्यांची व्यवस्था 
- प्लॅस्टीक व घनकरचा संकलन
-कचरा टाकण्यासाठी ठिकठिकाणी कचराकुंड्या बसविण्यात आल्या.
- शिवप्रतिज्ञा व जिजाऊ वंदना — भावनिक आणि ऐतिहासिक सन्मान 
🌧️ पावसाच्या धारांमध्येही मावळ्यांचा सहभाग हेच त्यांच्या शिवप्रेमाचे खरे प्रतीक ठरले!

🎖️ मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी व माजी प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे आणि आ. जयंत पाटील यांची उपस्थिती या उपक्रमाला राजकीय आणि सामाजिक पाठबळ मिळवून देणारी ठरली.

🗺️ “दर महिन्याला एक गड” या खासदार निलेश लंके यांच्या उपक्रमांतर्गत प्रतापगड हा सहावा गड ठरला — वारसासंवर्धनाच्या दिशेने एक ठाम आणि प्रेरणादायी पाऊल.


आपला प्रभाव

संख्या नाही, बदल मोजतोय!

६४५
स्वयंसेवक उपस्थित होते
१०
एकूण लागवड संख्या
२०
एलईडी लाईट बसवण्यात आले
ट्री गार्ड बसवण्यात आले
६ तास
एकूण कालावधी
०.५० टन
कचरा उचलला
एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या
२ हेक्टर
एकूण स्वच्छ केलेला परिसर
१९
एकूण फलक लावण्यात आले