आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
🏞️ तिकोणा किल्ला : पवन मावळचा जागृत पाहारेकरी
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वसलेला तिकोणा किल्ला — त्रिकोणी आकारामुळे सहज ओळखता येणारा — पवना सरोवराच्या सान्निध्यात उभा आहे. शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या या किल्ल्याला "पवन मावळचा पाहारेकरी" असे गौरवाने संबोधले जाते.
🗓️ २६ जुलै २०२५ रोजी या ऐतिहासिक गडावर एक प्रेरणादायी स्वच्छता व संवर्धन मोहीम पार पडली. मोहिमेचा उद्देश केवळ गड स्वच्छता नव्हता, तर शिवकालीन वारसा जतन, जनजागृती, आणि सर्वधर्मीय लोकसहभाग यावर विशेष भर होता.
🌿 मोहिमेची वैशिष्ट्ये:
🌧️ मुसळधार पावसातही मावळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला, हेच त्यांच्या शिवप्रेमाचे प्रतीक!
🗺️ खासदार निलेश लंके यांच्या “दर महिन्याला एक गड” उपक्रमांतर्गत तिकोणा हा पाचवा गड ठरला — एक पाऊल वारसासंवर्धनाच्या दिशेने.
🏞️ किल्ल्याचे वैशिष्ट्ये
• उंची: सुमारे ३४८० फूट
• चढण: मध्यम स्वरूपाची, दोन मुख्य वाटा
• दृश्ये: पवना सरोवर, हिरवेगार डोंगर, सातवाहनकालीन गुहा
• स्थळे: त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, तळजाई देवी मंदिर, चुन्याचा घाणा, भिंतीतला मारुती, तटबंदी, दरवाजे, पाण्याची टाकी
संख्या नाही, बदल मोजतोय!